नियंत्रण रेषेवर चकमक   

भारताचे पाकिस्तानला चोख उत्तर

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर आगळीक करणार्‍या पाकिस्तानी लष्कराला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले.जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटनास्थळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २८ पर्यटकांची निर्मम हत्या नुकतीच केली होती. त्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. जम्मू आणि काश्मीरजवळ गुरुवारी रात्री पाकिस्तानी सैनिकांनी युद्धबंदी कराराचे पुन्हा करुन भारतीय हद्दीच्या दिशेने गोळीबार केला. त्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिल्याचे सांगण्यात आले. नियंत्रण रेषेवरील काही भागात दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या काही घटना घडल्या आहेत. त्यात कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबाराला चोख उत्तर दिल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. 
 

Related Articles